あらすじ
शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील माहिती नव्हे तर ते जीवन जगण्याची कला शिकवणारी एक सुंदर प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत आनंद असेल तर केवळ शिकवणे न राहता जिवंत अनुभव बनते.”आनंदी शिक्षणाच्या वाटा” पुस्तक याच विचारांचा मागोवा घेते.जिथे शिक्षण केवळ पाठांतर, परीक्षा व गुणांच्या मागे धावणे नसून अनुभव,सृजनशीलता आणि आनंदाने भरलेली यात्रा आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण, पालकांचा दबाव दिसतो. अशा काळात शिक्षणाच्या मुळाशी जाऊन त्यात आनंद, कुतूहल, कौशल्य या मूलभूत भावनेची पुनर्स्थापना करणे ही काळाची गरज आहे.हे पुस्तक शिक्षक, पालक तसेच शिक्षण प्रेमींसाठी उपयुक्त ठरेल कारण यात केवळ तत्त्वज्ञान नाही तर प्रत्यक्ष कृतीशील प्रयोग व अनुभव आहेत. या पुस्तकात अध्यापनाच्या वेगळ्या वाटेवर पाऊल ठेवले आहे.ज्यातून विद्यार्थ्यांच्या क्षमतेला,कलांना चालना देतात.त्यांचे विचार विश्व समृद्ध करतात.यामुळे शिक्षण एकांगी न राहता विद्यार्थी व शिक्षक यांना सहप्रवासी बनवते.वर्ग बंदिस्त न राहता मुक्त होते.जेथे विचार, कल्पना आणि अनुभवाचा झरा खळखळून वाहतो. प्रस्तुत पुस्तक हे तुम्हाला शिक्षणाकडे नव्या दृष्टीने बघायला भाग पाडते.प्रश्न विचारायला प्रवृत्त करेल.तुमच्या मनातील शिक्षकाला जागृत करेल. तो शिक्षक स्वतः ही शिकतो आणि शिक्षण एक आनंदयात्रा मानतो. या वाटेवरचा हा प्रवास सुरू करायला तुम्ही तयार आहात का?