Mumbai Britishanchi Hoti Tevha... (मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा...)
MadhavShirvalkar
あらすじ
मुंबई एके काळी ब्रिटीशांची होती. तो काळ अवघड होता. ग्रामीण भाग सोडा, भारतातल्या मुंबईसारख्या शहरांत सुद्धा विकास शुन्य आणि पडिक व उजाड परिसर सर्वत्र पसरलेला होता. पोस्ट खातं नव्हतं, रेल्वे नव्हती, पोलिस नव्हते पण लुटारु, दरोडेखोर मात्र सर्वत्र होते. अंधश्रद्धेचा पगडा घट्ट होता. मुलगी जन्माला आली की तिला मारुन टाकण्याची स्त्रीभृणहत्येची मोठीच समस्या होती. विधवेला जगण्याचा हक्क नाकारणारी सतीची प्रथा होती. ब्रिटीश अशा प्रथांविरुद्ध उभे राहिले. विकासाचा मार्ग शोधत त्यांनी रेल्वे आणली. रस्ते आणि पूल बांधले. शाळा, कॉलेजेस, वाचनालये उभी केली. शिस्तीचं महत्त्वही त्यांनी आपल्यावर ठसवलं. पहिला मराठी शब्दकोशही ब्रिटीशांनीच तयार केला. पारतंत्र्याची काळी बाजू, इंग्रजांचे जुलूम आणि दडपशाही आपण पाठ्यपुस्तकात घोटून घोटून शिकलो. पण सुदैवाने, ब्रिटीशांच्या त्या सत्ताकाळाला वर उल्लेखलेली विधायक बाजूही होती. इतिहासाने नोंदवलेल्या त्या विधायक बाजूचे काही स्फूर्तिदायक आणि उद्बोधक असे कंर्गोरे ह्या पुस्तकांत आले आहेत. सर्व आदर्श लोपलेल्या काळातील भारतीय तरुणाईने, विस्मृतीत गेलेल्या ब्रिटीश काळातल्या त्या विधायक कर्तृत्वाकडे मागे वळून पाहण्याची, आणि त्यातून चांगले ते उचलण्याची आज नितांत आवश्यकता आहे.. 'मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा..' ह्या पुस्तकाने त्या गतकाळाकडे तोच विधायक कटाक्ष टाकला आहे.