'आंबेडकरी जलसा' ह्या पुस्तकाचे प्रकाशन २८ ऑगस्ट २०२२ ला मुलुंड येथे झाले. मोठे काका कालकथित हिरामणराव किसनराव शेजवळ ह्यांनी १९३६ ते १९५६ ह्या काळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आठवणींच्या रुपाने डोळ्यासमोर उभे केले. डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व, त्यांच्यावर असलेली आंबेडकरी जनतेची श्रद्धा, त्यांचे प्रखर विचार आणि वक्तृत्व, प्रगल्भता आणि नेतृत्व क्षमता ह्या सर्वच पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. एक संग्राह्य दस्ताऐवज असे ह्या पुस्तकाचे स्वरुप झाले आहे. ह्यातील कविता, पोवाडा आणि निवडक लेख देखील वाचकांच्या पसंतीस उतरले. अंधारातून प्रकाशाकडे ह्या एक शतकातील चित्रमय प्रवास देखील वाचकांच्या पसंतीना उतरला. ह्याचा आनंद होत आहे. पुस्तकाचे अनेक स्तरांवर स्वागत झाले. अनेक परिक्षणे छापून आली. वाचकांच्या निवडक प्रतिक्रियांचे संक्षिप्त संकलन करण्याचा प्रयत्न केला आहे.