あらすじ
प्रकाशकाचे मनोगत पद्मश्री विष्णु पण्ड्या जी भारतीय साहित्य आणि इतिहास संशोधनामधील एक थोर विभूति आहेत.गुजराती साहित्य विश्वात त्यांनी अतुलनीय आणि मौल्यवान अशी ग्रंथ संपदा निर्माण केली आहे."क्षण,समय और ....." हा पण्ड्या जी यांचा हिंदी काव्य संग्रह जेव्हा वाचण्यात आला तेव्हा ह्या कवितांमधील शब्द सौंदर्य स्थळे परमतत्वांना जाणून घेऊन आत्म तत्वाकडे घेऊन जातात तेव्हा ती अध्यात्मिक अनुभूति अवर्णनीय असते.हा अनुभव एखाद्या सतत कोसळणा-या पावसासारखा असतो . एखादी नदी पर्वत,द-या , खो-या पार करत समुद्राला भेटण्यासाठी सतत झेपावत असते नदीची ही असीम ओढ हा काव्य संग्रह वाचताना सतत जाणवत होती.पण्ड्या जीं च्या काव्य प्रतिभेचा हा आविष्कार आम्हीं निसर्गातील प्रतीकांमधून अनुभवत होतो.परंतु ही प्रकृतिची आत्मवत अनुभूति विराटतेच्या महाकाव्यात शून्यवत व्हावयास हवी !ह्या सर्व कारणांमुळे ह्या काव्य संग्रहाचा मराठी अनुवाद होणे अत्यावश्यक वाटले.मी माझ्या सुविद्य पत्निला अनुवाद करण्यासंबंधी पण्ड्या जी यांना विचारणा करण्यास सांगितले आणि तिने तसे केले असता पण्ड्या जी यांनी तर अगदी आनंदाने परवानगी ही दिली तथा पुढील काही दिवसां हा अनुवाद पूर्ण ही झाला आणि तो आता मराठी वाचकांसाठी ही उपलब्ध होत आहे. वर्ल्ड क्रिएटिव्हिटी फोरम तर्फे हा मराठी अवतार प्रकाशित होत आहे, मा.पद्मश्री पण्ड्या जी यांचे मराठी वाचकां तर्फे आभार. डॉ.राजेंद्र खटाटे