माझ्यासाठी हा केवळ एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आमुक किलोमीटर आमुक दिवसांत पार करणारा फक्त एक सायकल प्रवास कधीच नव्हता…!! ती एक आराधना होती, या महायज्ञात स्वतः ला झोकून देऊन पारखून घेण्याची ती आहुती होती. तुफान वाहणाऱ्या हायवे वर वावरणारी मुंगी ते विशाल महासागराशी हितगूज होते ते. एकमेकांची भाषा न समजणाऱ्या माणसांच्या भावविश्वाचा ठाव घेणारा सुर होता तो. दिवसाचा “मी हे करणारच” चा पुरुषी अहंकार, तर रात्रीच्या वेदणेच्या कुशीतले रुदन होते ते. पहाटेचा धुक्याशी हळवा प्रणय, तर दुपारचा रनरणता संग्राम होता तो. हिरव्यागार समृद्धतेचा कधी आहेर, तर कधी ओसाड माळरानाचा कोरडा ओरखडा होता तो. विहंगम क्षणांचा श्रीमंत खजिना होता तर कधी भणंग भिकाऱ्याची फाटकी झोळी होता तो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःला शोधण्याची शोधमोहीम होती ती.
ISBN: 9789334020274ASIN: 933402027X
NarayanPawarの他の書籍
あなたへのおすすめの本
माझा आत्मशोध (पुणे - रामेश्वरम - कन्याकुमारी सायकल प्रवास)