आकाशातल्या थेंबाचे सोने करून, मातीतून मोती पिकवण्याचे स्वप्न शेतकऱ्याना देणाऱ्या, कविमनाच्या विश्वविख्यात भवरलाल जैन या उद्योजकाची, उद्योगविश्वातील प्रेरक कथा ही संजीवक कहाणी आहे, ओसाडीतून नंदनवन निर्मिणाऱ्या, पाण्याच्या थेंबाथेंबातून जीवन देऊन शेतकऱ्याना समृद्ध करणाऱ्या, भूमी व भूमिपुत्रांवर प्रेम करणाऱ्या पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन या महापुरुषाची! त्यांनी केलेल्या संघर्षाची. निर्माण केलेल्या वेगळ्या वाटेची. श्रम, बुद्धी, संस्कार आणि निसर्ग प्रेमाच्या महामंत्राची आणि त्यातून निर्माण झालेल्या उत्तुंग यशाची!